पहिल्या चुकीनंतर "लहान आहे" म्हणून तिला माफ करणाऱ्या आई-वडिलांचा संयम यावेळी मात्र सुटला आणि त्यांनी स्वतःच पोलिसांत तक्रार दाखल केली. होनाजीनगर परिसरातील या मुलीचे कॉलनीतीलच एका मुलाशी प्रेमसंबंध होते. दोन्ही घरांतून या नात्याला तीव्र विरोध झाल्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. घराबाहेर पडण्यासाठी पैसा लागणार म्हणून मुलीने पहिल्यांदा थेट घरातील 11 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. मात्र, बाहेर परिस्थिती प्रतिकूल ठरली आणि दोन्ही कुटुंबीयांच्या शोधमोहीमेच्या दरम्यानच त्यांनी चूक मान्य करत घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पालकांनी त्यांना समजावून सांगत माफही केलं.
advertisement
चोर आल्याचं समजलं; मध्यरात्रीच तरुणांकडून 2 तास पाठलाग, थरारक घटनेत शेवटी काय घडलं?
काही महिन्यांनंतर पुन्हा त्याच प्रेमीयुगुलानी घरातून परत पळून जाण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी घरात रोकड ठेवणं बंद केल्यानं यावेळी मुलीने सोनंच लंपास केलं. घरातील 2 तोळ्यांच्या दागिन्यांमध्ये 10 ग्रॅम आणि 3 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 1 ग्रॅमची बाळी आणि 5 ग्रॅमचा सोन्याचा कॉइन घेऊन ती प्रियकरासह पळून गेली. मुलीच्या सततच्या चुकीच्या वागण्याने संतापलेल्या आईने अखेर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चाही रंगली आहे.
