पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुणी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या तक्रारीनुसार, राजेंद्र मच्छिंद्र भुसारे (वय ३५, रा. वाडगाव) याने तिचा विश्वास संपादन केला. त्याने तिला लग्नाचं खोटं आश्वासन देत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. लग्नाचं वचन देऊन तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत राहिला. मागील अनेक महिन्यांपासून तो पीडितेचं लैंगिक आणि मानसिक छळ करत होता.
advertisement
गर्भपातासाठी बळजबरी आणि मानसिक छळ
याच अत्याचारातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. तिने आरोपीला लग्नाबद्दल विचारले असता, त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर, त्याने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी बळजबरी केली. आरोपीच्या सततच्या दबावामुळे आणि मानसिक छळामुळे तिला नको असतानाही गर्भपात करावा लागला. या घटनेनंतरही आरोपीने लग्नाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. यामुळे हताश झालेल्या तरुणीने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
नराधमाविरोधात गुन्हा दाखल
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी राजेंद्र भुसारे याच्याविरोधात बलात्कारासह गर्भपातासाठी दबाव आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. लग्नाचं आमिष दाखवून अशाप्रकारे तरुणीचं लैंगिक शोषण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.