प्रदीप गंगाराम आरके असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीच्या पत्नीचे एका दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. याच त्रासाला कंटाळून पतीने टोकाचं पाऊस उचललं. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं प्रदीप यांच्याजवळ आढळून आलेल्या सुसाईट नोटमध्ये सांगितलं गेलं आहे.
Crime News : मराठवाड्याची पर्यटन राजधानी आता क्राइम कॅपिटल? छ.संभाजीनगरमध्ये गुन्हे वाढले का?
advertisement
प्रदीप आरके यांनी रजाळवाडी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आंब्याच्या झाडाला साडीने गळफास घेतला. या प्रकरणी जगन्नाथ गंगाराम आरके यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अनिता प्रदीप आरके आणि प्रियकर भाऊसाहेब विजय आरके यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार करत आहेत.
शहरात गुन्हेगारी वाढली -
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. दिवसाढवळ्या सर्रास गावठी कट्टे घेऊन गुंड, टवाळखोर मवाली, बिनधास्त फिरत आहेत. चालता बोलता गोळ्या झाडत आहेत, चाकू घेऊनही काहीजण फिरत आहेत. दररोज वाढणाऱ्या चोऱ्या, हाणामाऱ्या, गोळीबार चिंतेचा विषय झाला आहे. असंच चालू राहिलं तर संभाजीनगरचं बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी चर्चा आता सर्वसामान्य करू लागले आहेत.
