आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याच्या गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. स्वप्नील सुधाकर दांडगे (वय 22, रा. इच्छामणी हॉटेलसमोर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
ओळख वाढताच दोघांमध्ये प्रेम जुळले
पीडित 19 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी स्वप्नील याने तिला लग्नाचे आश्वासन देत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जानेवारी 2025 पासून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या कालावधीत दोघांमध्ये दररोज मोबाईलवर सातत्याने संवाद होत असे. विश्वास निर्माण झाल्यानंतर आरोपीने रात्रीच्या वेळी मुकुंदवाडी येथील एका मैदानावर भेटण्यास बोलावून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
advertisement
गर्भवती झाल्यानंतर प्रियकराचे लग्नासाठी हात वर
या संबंधातून सुमारे तीन महिन्यांपूर्वी पीडिता गर्भवती राहिली. याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी तिला काही गोळ्या दिल्या. त्या गोळ्या घेतल्यानंतर पीडितेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. प्रकृती खालावल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान गर्भधारणेची खात्री झाल्यानंतरही आरोपीने पीडितेशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि तिला टाळाटाळ करू लागला. मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर पीडित तरुणीने धैर्याने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
