मुंबई शहर आणि उपनगरात 24 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके इतकं असू शकतं. मुंबईला पुढील 24 तासांत उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना चांगलाच उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
लाह्यासाठी विकसित करण्यात आली नवीन वाण, कशी कराल लागवड? Video
पुण्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. 24 फेब्रुवारीला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील किमान तापमान कमी असल्याने त्याठिकाणी सकाळच्या वेळी काहीशी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 24 फेब्रुवारीला त्याठिकाणी अंशतः ढगाळ आकाश असू शकतं. छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे.
नाशिकमध्ये 24 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश राहून तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. नाशिकमधील तापमानात देखील आता वाढ होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आता चांगलाच उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमधील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. नागपूरमध्ये 24 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत नागपूरमधील तापमानात चांगलीच वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यातील सर्व प्रमुख शहरांत आता तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईतील तापमानात चांगलीच वाढ झाल्याने हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे नागरिकांनी आता उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे.





