TRENDING:

गणेशोत्सवात करा सुंदर असं डेकोरेशन, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच ठिकाणी मिळतं सर्व साहित्य

Last Updated:

या ठिकाणी तुम्हाला पडदे देखील मिळतील. तसेच रेडिमेड असे फुलांचे डेकोरेशनही फक्त 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.ग्रीन मॅटमध्ये, झुंबरमध्ये तुम्हाला भरपूर अशा व्हरायटी याठिकाणी मिळून जातील. यासोबतच मखरासाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा 100 रुपयांपासून मिळतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : आता लवकरच गौरी आणि गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यांच्या आगमनासाठी आपण सर्व तयारी करत आहोतच. पण सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डेकोरेशन. जर तुम्हाला सर्व डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायचा असेल, ते सुद्धा अगदी कमी दरामध्ये, तर छत्रपती संभाजीनगर शहरात एक ठिकाण असे आहे, ज्याठिकाणी तुम्ही ही सर्व खरेदी एकाच ठिकाणी करू शकतात. याचबाबत आपण आज जाणून घेऊयात.

advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी हे सर्व साहित्य उपलब्ध आहे. याविषयी तेथील दुकान विक्रेते मोहम्मद अमीर यांनी सविस्तर अशी माहिती दिली. गुलमंडी या ठिकाणी तुम्हाला सर्व साहित्य अगदी स्वस्त दरात मिळून जाईल. या ठिकाणी तुम्हाला डेकोरेशनसाठी लागणारी वेगवेगळी फुले, माळा उपलब्ध आहेत. माळा याठिकाणी शंभर रुपये जोडी या दराने विकल्या जात आहेत.

advertisement

YouTube च्या कमाईतून घेतले स्वतःचे घर आणि जागा, सोलापूरच्या तरुणाने नेमकं काय केलं?, VIDEO

या ठिकाणी तुम्हाला पडदे देखील मिळतील. तसेच रेडिमेड असे फुलांचे डेकोरेशनही फक्त 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.ग्रीन मॅटमध्ये, झुंबरमध्ये तुम्हाला भरपूर अशा व्हरायटी याठिकाणी मिळून जातील. यासोबतच मखरासाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा 100 रुपयांपासून मिळतील.

महालक्ष्मीचा सण, जालन्यातील आकर्षक कोठ्यांची सर्वत्र चर्चा, 50 वर्षांपासून हिंगोलीतील कारागिरांचा मोठा वाटा, VIDEO

advertisement

मखरासाठी लागणारे जे तोरण आहेत ते पण या ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला मोत्यांमध्ये तोरणही मिळेल. मोत्यांच्या तोरणाच्या किमती या 100 रुपयांपासून विकल्या जात आहेत. तर कापडाचे तोरणही 100 रुपयांपासून विकले जात आहेत. तुम्हाला कपड्यांमध्येही तोरण मिळेल. तसेच या ठिकाणी तुम्हाला डेकोरेशनसाठी सगळे लागणारे साहित्य अगदी 16 रुपयांपासून उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला हे सर्व साहित्य खरेदी करायचे असेल तर तुम्ही छत्रपती संभाजी नगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी जाऊन हे साहित्य खरेदी करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
गणेशोत्सवात करा सुंदर असं डेकोरेशन, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच ठिकाणी मिळतं सर्व साहित्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल