मराठा आरक्षण मुद्यावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये रंगलेल्या वादाला नवं वळण लागलं आहे. आरक्षणाअभावी मराठ्यांना लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागत असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे नवं वादंग निर्माण झालं होतं. खराडीतील जरांगेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी रविवारी हिंगोलीच्या सभेत टीका केली होती. खरं तर जरांगेंच्या पुण्यातील त्या वक्तव्यामुळे भुजबळांना टीका करण्याची आयतीचं संधी मिळाली आहे. तर त्या वक्तव्यावर खुलास करताना जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
advertisement
शिक्षण खूप घेऊन तो झेंडा पकडतो, तो बेरोजगार होतो, यासाठी मी लायकीवर बोललो होतो. (लायकीवर) मी त्यावर काय चूक बोललो, आमच्या लोकांचे हाल झाले, मी बोललो त्यात काही लायकीचा संदर्भ येत नाही, लायकी शब्दाला जातीय रंग दिला. तुम्ही हुतात्मा स्मारक गोमूत्राने धुतला. लायकीच्या वक्तव्यावरून जरांगे काहीसे बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. तर छगन भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना याच मुद्यावरून डिवचलंय. जरांगे भुजबळ वादात सत्ताधारी तसेच विरोधकांनीही सावध पवित्रा घेतला आहे.
वाचा - 'भुजबळांची भूमिका तीच सरकारची भूमिका', मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरागेंच्या मागणीला मंत्री छगन भुजबळांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे जरांगे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष पेटला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना थेट आव्हनप्रतिआव्हन दिलं जात आहे. अशातचं जरांगेंनी लायकीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे. त्यामुळे भविष्यात हा आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
