TRENDING:

रो-हाऊसमध्ये सुरू होतं भयानक कांड , इंजिनिअर तरुण अन् थेट दुबई कनेक्शन, छ. संभाजीनगरात खळबळ

Last Updated:

‎Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं आणि कोणावर गुन्हा दाखल झाला आहे ते एकदा सविस्तर जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎‎छत्रपती संभाजीनगर : लोक राहत असलेल्या परिसरातच डिजिटल जुगाराचा असा मोठा गोरखधंदा सुरू होता, हे पोलिस कारवाईनंतरच समोर आलं. भाड्याच्या घरातून मोबाइलवर चालणाऱ्या कॅसिनो गेम्समधून लाखोंचा सट्टा लावला जात होता. छत्रपती संभाजीनगरात ऑनलाइन सट्टेबाजीचे जाळे खोलवर रुजले असल्याचा आणखी एक मोठा नमुना समोर आला आहे.
दुबईतील सूत्रधार टक्केवारीने देतो वेबसाइटचे फ्रेंचायजी मॉडेल
दुबईतील सूत्रधार टक्केवारीने देतो वेबसाइटचे फ्रेंचायजी मॉडेल
advertisement

शहरातील उच्चशिक्षित तरुणांना सोबत घेऊन, दुबईसह देशातील काही ठिकाणी बसलेले मुख्य मेंदू या तरुणांना ‘वेबसाइट फ्रेंचायजी’च्या स्वरूपात डिजिटल जुगार चालवण्यासाठी तयार करीत असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. हे सर्व व्यवहार टक्केवारीवर चालत असून पैशांची देवाणघेवाण हवालामार्गे केली जात असल्याचेही पोलिसांना आढळले आहे.‎‎

कुंभेफळ परिसरातील एका रो-हाऊसमधून 24 तास विविध कॅसिनो गेम्स, 40 प्रकारचे ऑनलाइन खेळ आणि बेटिंग सर्व्हिसेस चालवल्या जात होत्या. स्वतःला सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणवून घर घेतलेल्या या तरुणांनी गेल्या महिनाभरात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लाखो रुपयांची उलाढाल केल्याचा अंदाज आहे.

advertisement

पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकून हे केंद्र पाडले.‎‎यात सूरज किरणसिंग पचलोरे (26, पोलिस कॉलनी, एन-7), प्रणव प्रल्हाद मानकर (2y, रा. आविष्कार कॉलनी), महेंद्र विनायक नवग्रह (26, रा. स्वामी विवेकानंदनगर, एन-12), प्रतीक नितीन मोरे (26, रा. प्रतापगडनगर, एन-9), सौरभ राजेंद्र महाले (27, रा. भवानीनगर, जुना मोंढा), राहुल शिवनाथ डनसेना (20), सूरजकुमार यादव (25), रोहन बिशकुमार (२७) व शहादाब खान वकील खान (28, चौघेही रा. छत्तीसगड) यांना अटक करण्यात आली.

advertisement

सर्व आरोपी तरुण सुशिक्षित घरातील आहेत. यातील पचलोरे हा काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये नोकरीला होता. तेव्हा त्याची असा घोटाळा करणाऱ्यांशी ओळख झाली. त्यात प्रामुख्याने शहादाबच्या वरील स्तरावरील सूत्रधारांनी सर्व सेटअप उभारल्यास काही वेबसाइट व आवश्यक आयडी देण्याचे कबूल केले होते.‎‎ केंद्र सरकारने अशा वेबसाइटवर बंदी आणली असली तरी विदेशी सर्व्हर, खोटी ओळख व शेकडो बोगस अॅप्सद्वारे देशभरात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे केंद्रिय गुप्तचर यंत्रणांनी आधीपासून लक्षात घेतले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळच्या नाश्ता होईल भारी, सेम भेजा फ्राय सारखी बनवा अंडा भुर्जी, रेसिपीचा Video
सर्व पहा

पैशांची परदेशात मोठ्या प्रमाणात खेळती ठेव होण्यासाठीही या माध्यमाचा वापर होत असल्याने अनेक शहरांवर गुप्त पाळत ठेवण्यात येत आहे. या निरीक्षणादरम्यानच कुंभेफळमधील हालचाली लक्षात आल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. छत्तीसगडमधील चार आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या साथीदारांनी इतर शहरांतही अशाच प्रकारचे सेटअप उभारल्याची शक्यता असून तपास पथक त्यासाठी छत्तीसगडकडे रवाना झाले आहे.‎‎शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात पोलिसांची हलचल कमी असते, रहिवाशांची ये-जा कमी असते आणि भाडेही स्वस्त मिळते. या कारणांमुळेच आरोपींनी कुंभेफळ परिसरातील वसाहत निवडल्याचे पोलिसांनी सांगितले.कुंभेफळातील या घरातून दिवस-रात्र चालणारा डिजिटल जुगार किती मोठ्या जाळ्याचा भाग आहे, हे आता पुढील तपासात स्पष्ट होणार आहे.‎

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रो-हाऊसमध्ये सुरू होतं भयानक कांड , इंजिनिअर तरुण अन् थेट दुबई कनेक्शन, छ. संभाजीनगरात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल