या घटनेतील रिक्षा चालक आरोपी युसुफ मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी अटक करत त्याची शहरातील महावीर चौक ते रेल्वे स्थानक परिसरापर्यंत धिंड काढली. त्याचबरोबर त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची आहे. माहिती वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली आहे.
रिक्षाचालक युसूफ मोहंमद अली अन्सारी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे उघड झाले आहे. साडेतीन महिन्यांपूर्वीही त्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याची माहिती निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. 11 ऑगस्ट 2025 रोजी त्याने कामगार उपायुक्त कार्यालयातील एका शासकीय नोकरदार महिलेशी तिकीट (भाड्याच्या) पैशांवरून हुज्जत घातली होती. रेल्वेस्टेशन चौकात हा प्रकार घडला होता. त्या वेळी तेथे गेलेल्या वाहतूक पोलिसाशी त्याने हुज्जत घालत धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी त्याच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
advertisement
थेट पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर शहरात दिवसभर प्रत्येक चौकात शहर पोलिसांच्या पथकाने कठोर कारवाई सत्र राबवले. दिवसभरात एकूण 797 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 32 रिक्षा जप्त करण्यात आल्या, तर एकूण 9 लाख 66 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी 3 लाख 67 हजार रुपयांचा दंड वसूलही करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात दिवसभर प्रत्येक चौकाला छावणीचे स्वरूप आले होते. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.