काळजीपोटी शेतात पोहोचले अन्...
प्रसाद भाऊसाहेब शिंदे (वय 22) असे या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी ही धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रसाद बराच वेळ फोन उचलत नसल्याने त्याचे मित्र आणि कुटुंबीय काळजीपोटी शेतात पोहोचले, तेव्हा तो तिथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासात मृत घोषित केलं. प्रसादने विष प्राशन करून आपली आयुष्य संपवल्याचे समोर आलं आहे.
advertisement
26 जानेवारी रोजी लग्न होतं
या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे, कारण प्रसाद हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. संपूर्ण घराची आणि शेतीची जबाबदारी तो समर्थपणे सांभाळत होता. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांवर म्हणजे 26 जानेवारी रोजी त्याचं लग्न होणार होतं. लग्नाची खरेदी आणि तयारी जोरात सुरू असतानाच ही काळाने झडप घातल्याने गावातील प्रत्येक जण हळहळत आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद
दरम्यान, प्रसादचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि कष्टकरी होता, त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल का उचललं, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
