TRENDING:

Chhatrapati Sambhajinagar News: 101 मोबाईल आणि पर्स, छ.संभाजीनगरच्या पोलिसांच्या कामगिरीने सगळेच भारावले!

Last Updated:

सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कार्यक्षमतेचे उदाहरण घालून दिले आहे. शहरातील रिक्षा, बस किंवा गर्दीच्या ठिकाणी हरवलेले, विसरलेले किंवा चोरीस गेलेले असे तब्बल 101 मोबाईल फोन व पर्स शोधून काढण्यात पोलिसांना यश आले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कार्यक्षमतेचे उदाहरण घालून दिले आहे. शहरातील रिक्षा, बस किंवा गर्दीच्या ठिकाणी हरवलेले, विसरलेले किंवा चोरीस गेलेले असे तब्बल 101 मोबाईल फोन व पर्स शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, एकूण किंमत सुमारे 16 लाख 25 हजार रुपये इतका मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन करण्यात आला.
advertisement

‎सिडको हद्दीत गेल्या काही महिन्यांत नागरिकांकडून विविध कंपन्यांच्या मोबाईल हरवल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंद होत होत्या. रिक्षा किंवा बसमध्ये घाईत विसरून जाणे, गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीस जाणे, पर्स हरवणे अशा अनेक घटना समोर येत होत्या. या सर्व तक्रारींचा तपशील गोळा करून विशेष पथकाने सर्व प्रकरणांवर काटेकोरपणे काम सुरू केले. तपासादरम्यान अंमलदारांनी तांत्रिक साधनांचा व्यापक वापर केला.

advertisement

मोबाईलचे आयएमईआय नंबर ट्रॅक करणे, सायबर पोलीस स्टेशनशी समन्वय साधून लोकेशनचा मागोवा घेणे, प्राप्त माहितीची तपासणी करणे अशा पद्धतीने प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला. अनेक मोबाईल वेगवेगळ्या भागांत वापरात असल्याचे समोर आल्यावर त्यांचे वापरकर्त्यांशी संपर्क साधत मालकांपर्यंत तो परत आणण्यात पथकाला यश मिळाले. अखेर, विविध ठिकाणी सापडलेले व शोधून काढलेले 101 मोबाईल व पर्स शनिवारी संबंधित नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून सुपूर्द करण्यात आले. हरवलेली वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

advertisement

‎‎

‎योगीता मोरे रा. एन-08 आदिवाशी होस्टेल, छत्रपती संभाजीनगर यांचा मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचे पतीचे निधन झाले आहे. त्यांचे पतीनी त्यांना मोबाईल भेट दिला होता. हा त्यांचे पतीची शेवटीची भेट होती म्हणुन सदरचा मोबाईल हा त्यांचे पतीची आठवण म्हणून त्यांचे कडे होता. परंतु  मोबाईल  हरविला होता. त्यांनी पोलीस स्टेशन सिडको येथे मोबाईलची तक्रार दिली व पोलीसांना सदरचा मोबाईल त्यांचे साठी खुप महत्वाचे आहे तो मिळवुन देण्यासाठी भावनीक विनंती केली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर गडगडले, सोयाबीनच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

पोलीस स्टेशनचे मोबाईल ट्रेसींगचे काम पहाणारे अंमलदार यांनी त्यांचा सदरचा मोबाईल त्यांना परत मिळवून दिल्याने त्यांनी अतिशय आनंद व्यक्त करुन त्यांनी सिडको पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानले आहे. ‎सिडको पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हरवलेल्या वस्तूंबाबत तक्रार केल्यावर योग्य तपास होतो आणि वस्तू परत मिळू शकतात, असा सकारात्मक संदेश यामुळे दिला गेला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhajinagar News: 101 मोबाईल आणि पर्स, छ.संभाजीनगरच्या पोलिसांच्या कामगिरीने सगळेच भारावले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल