याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाकडून या प्रदर्शनाचं आयोजन केलं जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची वेळ घेऊन या वाघनखांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजिक केला जाणार आहे. ही वाघनखे 3 मे 2026 पर्यंत शाहू जन्मस्थळ येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील.
Health Check-up: ना कसली डिग्री ना सर्टिफिकेट तरीही केली आरोग्य तपासणी! इचलकरंजीत धक्कादायक प्रकार
advertisement
वाघनखे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलं एक धारदार शस्त्र होतं. हे शस्त्र वाघाच्या पंज्याप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे आहेत. ही वाघनखे हातात लपवता येत असत आणि गुप्तपणे हल्ला करण्यासाठी वापरली जात असत. अलीकडेच लंडनहून ही वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्यात आली आहेत. ही वाघनखे शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेली होती, असं म्हटलं जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून लंडनमधील 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट' संग्रहालयातून ही वाघनखे 3 वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. नागरिकांना ही ऐतिहासिक वाघनखे पाहता यावीत यासाठी त्यांचं राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रदर्शन भरवलं जात आहे. सध्या ही वाघनखे साताऱ्यात असून 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान कोल्हापुरात येणार आहेत. वाघनखांच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केलं जाणार आहे. शाही दसरा सोहळा झाल्यानंतर हे प्रदर्शन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.