TRENDING:

खरंच पुढच्या ३ महिन्यात LPG बंद होणार? भुजबळांच्या वक्तव्यावर CM फडणवीस म्हणाले...

Last Updated:

पुढील तीन महिन्यात कदाचित एलपीजी बंद होऊ शकतो, असे विधान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आखाती देशांमधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा प्रचंड तुटवडा झाला आहे. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी एलपीजी पुढील तीन महिन्यात कदाचित बंद होऊ शकतो, असे विधान केले. एलपीजी बंद झाला तर काय करायचे? अशा विचाराने सर्वसामान्य लोक चिंतेत आहेत. भुजबळ यांचे वक्तव्य आणि पीएनजीच्या (पाईप लाईन गॅस) भविष्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी पीएनजीचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगितले.
छगन भुजबळ-देवेंद्र फडणवीसोम
छगन भुजबळ-देवेंद्र फडणवीसोम
advertisement

एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या पत्रकाचा उल्लेख करत राज्यातील पीएनजी गॅसची जोडणी वाढवण्याची गरज भुजबळ यांनी अधोरेखित केली. जर पीएनजीची जोडणी वाढली तर एलपीजीची गरज भासणार नाही, असे अप्रत्यक्षपणे भुजबळ म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले.

...तर एलपीजीची आवश्यकता पडणार नाही!- मुख्यमंत्री फडणवीस

सगळ्या शहरांमध्ये पीएनजीचे (पाईप लाईन गॅस) काम सध्या सुरू आहे. महानगर गॅस निगम लिमिटेड यांच्याकडून पाईपलाईन टाकण्याचे काम करीत आहेत. पाईपमधून गॅस पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. कालच शासनाच्या वतीने एक जीआर काढून आपण गॅस पाईप लाईन टाकण्याकरिताच्या नियम आणि अटी शिथिल केल्या आहेत. पीएनजी आपल्याकडे मुबलक उपलब्ध आहे. लवकरात लवकर आपण जर गॅस पाईप लाईन टाकली तर एलपीजीची आवश्यकता पडणार नाही. शहरांवरचा एलपीजीचा भार आपण कमी केला तर भविष्यातील संकटसमयी आपल्याला अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. एकप्रकारे त्यांनी भुजबळ यांच्या संकेताला दुजोरा दिला.

advertisement

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कुलरची गार हवा तुमच्या जीवावर बेतू शकते! अशी चूक करू नका!
सर्व पहा

विज्ञान भवन नवी दिल्ली येथे निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी आणि पीएनजी गॅसचा अधिक चांगला आणि सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत छगन भुजबळ यांनी सहभाग नोंदविला. यानंतर तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खरंच पुढच्या ३ महिन्यात LPG बंद होणार? भुजबळांच्या वक्तव्यावर CM फडणवीस म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल