TRENDING:

लाडक्या बहि‍णींना २१०० रूपये मिळणार का? मुख्यमंत्री फडणवीसांचं 'कभी खुशी-कभी गम' उत्तर

Last Updated:

अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात लाडक्या बहि‍णींच्या हफ्त्यामध्ये वाढ करून २१०० रूपये केले जातील, अशी अपेक्षा होती, मात्र...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महायुती सरकार सत्तेत आल्यावर लाडक्या बहि‍णींना प्रतिमाह २१०० रूपये देऊ, अशी घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सरकार बदलल्यानंतर खुर्च्या बलदल्या, तसे घोषणांचे अर्थही बदलले. लाडक्या बहि‍णींच्या हफ्त्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या तिजोरीचे कारण पुढे करू योग्यवेळी २१०० रूपये देऊ, असे सरकारमधील नेते सांगत राहिले. सत्तेत येऊन दीड वर्षे झाले तरी घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात २१०० रुपयांची घोषणा होणार का? याकडे तमाम लाडक्या बहिणांचे डोळे लागले होते.
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
advertisement

अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात कृषि, उद्योग, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आदी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठी कोणत्या घोषणा असणार याकडे महिला भगिनींचे लक्ष लागले होते. तसेच लाडक्या बहि‍णींना पुढच्या महिन्यापासून २१०० रूपये मिळणार का? असा सवालही विचारला जात होता. परंतु अर्थसंकल्पात कोणतेही ठोस उत्तर न देता मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'भरघोस निधी' यावर वेळ मारून नेली.

advertisement

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे सांगून १५०० रूपयांचे २१०० रूपये कधी, या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजूनही अनुत्तरित ठेवले. यावेळी मात्र त्यांनी महिलांसाठी खास योजना जाहीर केल्या.

अर्थसंकल्पात महिलांसाठी योजना काय?

- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भरीव तरतूद

-अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करुन लाभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार.

advertisement

-एकल महिला धोरण सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणणार.

-लखपती दिदी: राज्यात २७ लाख लखपती दिदी झाल्या, २०२६-२७ मध्ये आणखी २५ लाख लखपती दिदी करणार.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
व्यवसायाला विदेशी बाजारपेठेचं स्वरूप,बनवतात लाकडी वस्तू, 2 लाखांची उलाढाल
सर्व पहा

-महिला बचतगटांच्या वस्तु उत्पादन, विक्रीसाठी १३ जिल्ह्यात उमेद मॉल

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लाडक्या बहि‍णींना २१०० रूपये मिळणार का? मुख्यमंत्री फडणवीसांचं 'कभी खुशी-कभी गम' उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल