सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगानेदेखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे राजकीय पक्षांनी देखील निवडणुकीसाठी नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे.
फडणवीसांनी दिला कानमंत्र!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील आमदारांची सोमवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी थेट कानमंत्र दिला आहे. "या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला पाहिजे, यासाठी तुम्ही प्रत्येक मतदारसंघात झोकून द्या," असे आदेशच त्यांनी आमदारांना दिले आहेत.
advertisement
मंगळवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठवाड्यातील भाजप आमदारांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, "तुमच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची पाच कामं मला सांगा. त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल." या बैठकीत स्थानिक समित्यांचे वाटप करण्याचा अधिकारही संबंधित आमदारांना दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
महापालिकांमध्ये भाजपचाच झेंडा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडफडला पाहिजे. त्यासाठी हवी ती ताकद मी देणार असल्याचा शब्द देखील फडणवीसांनी दिला. कोणत्याही मतदारसंघात आमदारांच्या विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही. सर्व निर्णय तुम्हाला विश्वासात घेऊनच घेतले जातील, असे सांगत त्यांना आश्वस्त केले.