TRENDING:

Devendra Fadnavis: विदर्भात बोगस मतदान झालं का? राहुल गांधींच्या आरोपावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

Last Updated:

'भारत घाबरला होता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार म्हणून पण ते लवंगी पाहून सुद्धा फटाका फोडू शकले नाही. फुसका बार लावला आहे'

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतांची चोरी झाली याबद्दल निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. पण, 'हायड्रोजन बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब सांगितला का? भारत घाबरला होता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार म्हणून पण ते लवंगी पाहून सुद्धा फटाका फोडू शकले नाही. फुसका बार लावला आहे' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांची खिल्ली उडवली.
News18
News18
advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राहुल गांधींच्या आरोपावर भाष्य केलं.

'मी मागच्या काळातही सांगितलं सिरीयल लायर आहेत. मी एकाच गोष्टीसाठी त्यांना मार्क देईल सर्व मीडियांसमोर येऊन खोटं बोलणं हे आपल्या आपल्या मध्ये एक कर्तृत्व आहे. इतके दिवस त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली पण ते एकही पुरावा देऊ शकले नाहीत. ते किती खोटं बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. जनतेत जातील तेव्हा निकाल त्यांच्या बाजूने कधीतरी येतील. बोलता असं की जसं काही त्यांच्याकडे सर्वच काही आहे. सातत्याने खोटं बोलत जणू काही लोकांना ते खरंच वाटेल' असंही फडणवीस म्हणाले.

advertisement

राहुल गांधी यांनी ग्लोबेल्सचं तत्व वापरलं आहे. निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. पण त्यांनी आजपर्यंत कधीच पुरावा दिला नाही. अशा प्रकारचा नेता मी कधीच पाहिला नाही. त्यांनी कितीही खोटं बोलले तरी त्यांनी जनतेमध्ये जावं लागणार आहे. जनतेनं कधी तरी पाठिंबा दिला तर तो विषय असेल. पण ते सारखं खोटं बोलताय. जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. ते आपल्या कार्यकर्त्यांचं समाधान करत आहे. त्यामुळे कधीच त्यांच्या बाजूने निकाल लागणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

advertisement

राहुल गांधींनी राजुरामध्ये केला 6850 बोगस मतदारांचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघाचा उल्लेख राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. या मतदारसंघात मागील दोन टर्ममध्ये चुरशीची निवडणूक झाली होती. राहुल गांधी यांनी या मतदारसंघात 6850 मतदार बोगस असल्याचा आरोप केला. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणूक निकालाला चांगलेच महत्त्व आले.

राजुरामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सुभाष धोटे यांचा विजय झाला होता. त्यांना 60 हजार 228 मते मिळाली. तर, वामनराव चटप यांना 57 हजार 727 आणि भाजपच्या संजय धोटे यांना 51 हजार 051 मते मिळाली. काँग्रेसचा अवघ्या 2,509 मतांनी विजय झाला.

advertisement

राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या 2024 मधील निवडणुकीत भाजपचे देवराव भोंगळे यांचा विजय झाला. त्यांना 72 हजार 882 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांना 69 हजार 828 मते मिळाली. तर, तिसऱ्या स्थानावरील स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांना 55 हजार 090 मते मिळाली. भाजपचा या मतदारसंघात अवघ्या 3,054 मतांनी विजय झाला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis: विदर्भात बोगस मतदान झालं का? राहुल गांधींच्या आरोपावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल