TRENDING:

'शेतकऱ्यांसाठी CM दिल्लीला गेलेच नव्हते, फक्त...', काँग्रेस प्रदेशाध्यक्षांंचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Last Updated:

मुख्यमंत्र्यांनी कोणताही अहवाल केंद्राला दिला नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला गेले होते. पण तिथे थांबले नाही. त्यांनी मुळात तिथे मदत घेऊनच परत यायला पाहिजे होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : राज्यभरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. एकीकडे शेतकरी हवालदील झाला आहे, पण अजूनही सरकारकडून ठोस अशी मदतीची घोषणा झालेली नाही. विरोधकांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहे. तर, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते, पण ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गेले नव्हते तर गडचिरोलीतील उद्योजकांच्या उत्खनन खाणीसाठी एनओसी मागण्यासाठी गेले होते', असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
News18
News18
advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सपकाळ यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

'राज्यात अतिवृष्टीमुळे भयंकर परिस्थितीत आहे.  भाजपने आपल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली होती. ती आता पूर्ण केली पाहिजे, केंद्राकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतीही मदत मागितली नाही. पाऊस काही आताच पडला आणि नुकसान झालं असं नाही. एप्रिल महिन्यांपासून गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणताही अहवाल केंद्राला दिला नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला गेले होते. पण तिथे थांबले नाही. त्यांनी मुळात तिथे मदत घेऊनच परत यायला पाहिजे होते. त्यांनी तिथे कोणता अहवाल दिला हे काही कळायला काम नाही. गडचिरोली, सुरजागड इथं उत्खनन प्रकल्प आहे. जे उद्योजकांसाठी महत्त्वाचे आहे. उद्योजकांना इथं उत्खनन करून मोठा भ्रष्टाचार करायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्राकडे गो अहेड घेण्यासाठी गेले होते. ते शेतकऱ्यांसाठी दिल्लीला गेले नव्हते' असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला.

advertisement

तसंच,'फडणवीस यांना गडचिरोलीची चिंता आहे. राज्यात अजूनही पालकमंत्री निवडले गेले नाही. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये कुरघोडी सुरू आहे. पण फडणवीस हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले गडचिरोलीचे. त्यांच्याकडे महाराष्ट्राचं पालकत्व आहे. पण त्याकडे फडणवीस लक्ष देत नाही. दिल्लीला जाऊन ते हात हलवत खाली आले. याचा आम्ही धिक्कार करतो' अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

advertisement

मुह मे राम बगल मे छुरी. संघाने गांधी पुतळ्याजवळ पथसंचलन करताना नथुराम गोडसे, अस्पृश्ता मान्य नाही. त्यांनी बुरसेटलेला विचार सोडावा. मनुस्मृती bunch of tought दहन करावे आणि संविधानाचा स्विकार करावा, हे जर झालं तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही सपकाळ म्हणाले.

'मंत्र्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही'

'शेतकरी अडचणीत आहे त्यांना मदत करणे आवश्यक आहे मात्र हे सरकार मदत करताना दिसत नाही. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत करायला पाहिजे. आम्ही आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू आंदोलन करू. शेतकरी देशो धडीला लागले आहे त्यांना मदत आवश्यक आहे. उद्यापासून नागपूर च्या दीक्षाभूमी पासून सेवाग्रामपर्यंत पदयात्रा काढणार आहोत. तुषार गांधी नेतृत्व करणार आहे. आज नागपुरात मशाल यात्रा काढत आहे. शेतकऱ्यांना मदत नाही दिली तर एकाही मंत्र्याला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'शेतकऱ्यांसाठी CM दिल्लीला गेलेच नव्हते, फक्त...', काँग्रेस प्रदेशाध्यक्षांंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल