नवरात्रीची आठवी माळ: संकटं दूर होतील, सुख-समृद्धी नांदेल, अशी करा महागौरी देवीची पूजा, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Navratri 2025: नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी पूजली जाणारी महागौरी देवी ही करुणा आणि दयेचे प्रतीक मानली जाते. पुराणात तिला अन्नपूर्णा आणि ऐश्वर्य प्रदायिनी असेही म्हटले आहे.
मुंबई: शारदीय नवरात्र उत्सव आता सांगतेकडे आला आहे. सोमवार, 29 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्रीची आठवी माळ असून या दिवशी आपण महागौरी देवीची पूजा करतो. नवरात्रीच्या आठव्या माळेला दुर्गाष्टमी असेही म्हटले जाते. या दिवशी देवीची पूजा कशी करावी? तसेच देवीला नैवेद्य कोणता अर्पण करावा? याबद्दल मुंबईतील आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल 18 च्या माध्यमातून माहिती दिलीये.
देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मंदिरांमध्ये तसेच घरोघरी देवीची पूजा, आरती, गरबा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे नवरात्रीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. नवदुर्गेने आपल्या नऊ रुपांमधून महिषासुराचा वध केला, ही गाथा सर्वश्रुत आहे. देवीला महिषासुरमर्दिनी, करवीरपुरवासिनी, दुर्गा अशा अनेक नावांनी ओळखले जाते.
advertisement
महागौरी देवीचे स्वरूप
अष्टमीच्या दिवशी पूजली जाणारी महागौरी देवी ही करुणा आणि दयेचे प्रतीक मानली जाते. पुराणात तिला अन्नपूर्णा आणि ऐश्वर्य प्रदायिनी असेही म्हटले आहे. देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे. एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात डमरू, तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा दर्शवतो. पौराणिक कथेनुसार महागौरी ही भगवान शिवाची अर्धांगिनी असून ती भक्तांचे संकट दूर करून सुख-समृद्धी देते.
advertisement
देवीला अर्पण करावयाची माळ
या दिवशी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी देवीला बेल, धोत्रा किंवा रुईच्या झाडाची पानांची माळ अर्पण करावी. या पानांची माळ देवीला अत्यंत प्रिय मानली जाते आणि यामुळे भक्ताला विशेष पुण्यफळ मिळते.
पूजा विधी आणि नैवेद्य
अष्टमीच्या दिवशी सर्वात आधी व्रताचा संकल्प करून देवी महागौरीची स्थापना करावी. देवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र व फुले अर्पण करावीत. पूजा करताना धूप, दीप, गंध, अक्षता अर्पण करून मंत्रोच्चारासह आरती करावी. देवीला पुरी-भाजी, साखर फुटाणे, चणे, तसेच पांढऱ्या रंगाची मिठाईचा नैवद्य असावा. तसेच या दिवशी कन्या पूजन करण्याची प्रथा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 6:48 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्रीची आठवी माळ: संकटं दूर होतील, सुख-समृद्धी नांदेल, अशी करा महागौरी देवीची पूजा, Video