पुढचे 7 दिवस कसं राहील हवामान?
हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडे थंडी वाढले आहे, पाऊस गेला आता 9 ते 11 नोव्हेंबर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडील चार राज्यांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मैदानी प्रदेशात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 2 ते 4 डिग्री तापमान पुढच्या 7 दिवसात घसरण्याची शक्यता आहे.
advertisement
दक्षिण भारतात पुन्हा पाऊस
दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा पावसाचं संकट राहणार आहे. त्यामुळे तळ कोकणात, पाऊस आणि थंडी असं दुहेरी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 9 ते 13 नोव्हेंबर पर्यंत तळ कोकणात पावसाच्या हलक्या सरी राहण्याची शक्यता आहे. पहाटेच्या वेळी दव पडून थंडी राहणार असल्याने कोकणातील पिकांवर आणि बागायतीवर मोठं संकट आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
चार सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका
उत्तर हरियाणाजवळ आज सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती तयार झाली आहे. दुसरी जम्मूपासून हिमाचल लडाखपर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती आहे. तिसरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती आहे. चौथी पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम हवामानावर झाला आहे. दुपारी वाढलेली उष्णता आणि रात्री थंडी असं दुहेरी वातावरण मुंबईसह आसपासच्या परिसरात अनुभवयला मिळत आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट?
उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 2-4 डिग्रीने हळूहळू तापमान कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढचे सात दिवस कुठेही तीव्र थंडीची लाट येईल असा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र थंडी येणार असून त्याचा कडाका वाढेल तापमान आणखी कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
