TRENDING:

Congress BJP Clash: मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, उमेदवाराचा मुलगा रुग्णालयात दाखल

Last Updated:

Congress BJP Clash: मुंबईत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद असताना दुसरीकडे धाराशिवमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं,  भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
advertisement

धाराशिव: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या मतदानाला काही दिवसच राहिले असल्याने जोरदार प्रचार सुरू आहे. तर, दुसरीकडे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. मुंबईत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद असताना दुसरीकडे धाराशिवमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.

advertisement

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पैसे वाटपाच्या आरोपातून भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी उशिरा रात्री जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. यामुळे कळंब शहरात खळबळ उडाली.

advertisement

भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाणीचा आरोप

प्रभाग क्रमांक सहा येथील भाजप उमेदवार सारिका वाघ यांच्या वतीने पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक धाड टाकली. या दरम्यान सारिका वाघ यांचे पती रमेश वाघ हे पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा काँग्रेसचा दावा आहे. यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले. वादावादीनंतर जोरदार हाणामारी झाली. काँग्रेस उमेदवाराच्या मुलाने रमेश वाघ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

advertisement

आमच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण, काँग्रेसचा प्रत्यारोप

भाजपच्या आरोपानंतर काँग्रेसने भाजपवर पलटवार केला आहे. पैसे वाटपाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या 10 ते 15 जणांनी एकत्र हल्ला चढवल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार पांडुरंग कुंभार यांचा मुलगा राहुल कुंभार यांनी केला. या हल्ल्यात त्याचा पाय मोडल्याचे आणि तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. राहुल कुंभार हे देखील या मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

advertisement

कळंब पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर तणाव

घटनेनंतर दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी कळंब पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी नोंदवण्यासाठी रात्रभर धावपळ केली. मध्यरात्रीपर्यंत पोलीस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण राहिले. दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर कळंबमध्ये झालेल्या या हाणामारीमुळे राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्हाला माहितीये का? नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यातला नेमका फरक; समजून घ्या!
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Congress BJP Clash: मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, उमेदवाराचा मुलगा रुग्णालयात दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल