या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक, खा. रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान, खा. प्रणिती शिंदे, आ. डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, आ. अमित देशमुख, ऍड, के. सी. पाडवी, खा. वर्षा गायकवाड, आ. अस्लम शेख, आ. डॉ. विश्वजित कदम, एम.एम. शेख, मुजफ्फर हुसेन, रणजित कांबळे, माजी मंत्री रमेश बागवे, राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप, आ. साजीद खान पठाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत पुरके, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, एस सी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे अध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख आदींचा या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
advertisement
राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम कसा असणार?
-अर्ज दाखल करण्याची तारीख -१० नोव्हेंबर २०२५
-अर्ज दाखल अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५
-छाननीची तारीख-१८ नोव्हेंबर २०२५
-माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५
-अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- २५ नोव्हेंबर २०२५
-निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर २०२५
-मतदानाचा दिवस -२ डिसेंबर २०२५
