सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांदा आणि मक्याची आज काय स्थिती? इथं चेक करा
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
मुंबई: शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा आणि मक्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याचे दर गडगडले
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 24 हजार 187 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 6 हजार 289 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1106 ते जास्तीत जास्त 1600 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल मक्यास 2600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
Success Story : 10 गायीपासून केली सुरूवात, दुग्ध व्यवसायानं नशीबचं पालटलं, वर्षाला 90 लाखांची उलाढाल
कांद्याची उच्चांकी आवक मात्र भाव दबावातच
राज्याच्या मार्केटमध्ये 96 हजार 537 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 45 हजार 829 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 346 ते 1739 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 882 क्विंटल पांढऱ्या कांद्यास 100 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 45 हजार 977 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 11 हजार 815 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3851 ते 4875 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 187 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 3200 ते 4700 प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Nov 15, 2025 8:59 PM IST





