Success Story : 10 गायीपासून केली सुरूवात, दुग्ध व्यवसायानं नशीबचं पालटलं, वर्षाला 90 लाखांची उलाढाल

Last Updated:

या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची वर्षाला जवळपास 80 ते 90 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.

+
दुग्ध

दुग्ध व्यवसायातून थेट परदेशात ओळख; अनिल शेळके यांची 90 लाखांची वार्षिक उलाढाल..!

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंबेफळ येथील अनिल शेळके हे दुधापासून तयार होणाऱ्या तूप, दही, श्रीखंड, लस्सी यासह विविध पदार्थांचे स्वतः उत्पादन घेतात. त्यांच्याकडे दूध संकलन केंद्र देखील आहे. शेळके यांनी सन 2020 मध्ये विघ्नहर्ता गोविन या नावाच्या उत्पादनाची निर्मिती केली. तसेच त्यांचे पदार्थ महाराष्ट्रासह परदेशात देखील विक्री केले जातात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची वर्षाला जवळपास 80 ते 90 लाख रुपयांची उलाढाल होत असून खर्च वजा करून एकूण निव्वळ कमाई 10 ते 12 लाख रुपये वर्षाकाठी मिळत असल्याचे शेळके यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
कुंबेफळ येथे सन 2020 मध्ये अनिल शेळके यांनी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी बारामती येथे प्रशिक्षण घेतले. बेंगलोर येथून 10 गाई खरेदी केल्या आणि चार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोना या आजाराचा प्रसार होऊ लागला. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन केले होते. लॉकडाऊनमुळे सर्व मार्केट ठप्प पडले, या गाईंच्या माध्यमातून निघणारे दूध देखील विक्री होईना गेले ते वाया जात होते. दुधाची विक्री झाली नाही तर ते फेकून द्यावे लागत होते मात्र विचाराला दूध फेकून देण्यापेक्षा यावर काही प्रयोग केला तर फायद्याचे ठरेल, तसेच भरपूर वेळ देखील होता.
advertisement
फेकले जाणाऱ्या दुधावर अभ्यास केला त्या दुधाला उपयोगात कसे आणावे यासाठी मोबाईलवर युट्युब सारख्या माध्यमातून ऑनलाइन माहिती घेतली. तूप, दही, श्रीखंड आणि लस्सी यासह विविध पदार्थ कसे बनवावेत हे प्रत्यक्षात अनुभवले आणि तेव्हापासून सर्वत्र सर्व पदार्थांची मागणी वाढत गेली. ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे एक-एक करून पदार्थ आम्ही बनवत राहिलो, अशी प्रतिक्रिया देखील शेळके यांनी दिली.
advertisement
नवीन व्यवसायाची सुरुवात कशी करावी?
नवीन व्यवसायिकांना दुग्ध व्यवसायामध्ये आपले करिअर आणि भविष्य घडवायचे असल्यास सुरुवातीच्या काळामध्ये 10 गाई खरेदी कराव्यात. यामध्ये ओपन गोठा करून मोर घास केले चांगले नियोजन केले तर यासाठी मेहनत कमी लागते. पारंपारिक पद्धतीने त्यांचा सांभाळ केल्यास जास्त खर्च होतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : 10 गायीपासून केली सुरूवात, दुग्ध व्यवसायानं नशीबचं पालटलं, वर्षाला 90 लाखांची उलाढाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement