चिखलात माखली, गुडघे फोडून घेतले; शूटिंगदरम्यान भान विसरली अभिनेत्री, ओळखणंही कठीण, पाहा BTS PHOTOS

Last Updated:

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने एका सीनसाठी चक्क चिखलात लोळण घेतली आहे. इतकंच नाही, तर हे शूटिंग करताना तिचे गुडघेही फुटले आहेत.

News18
News18
मुंबई: 'घरोघरी मातीच्या चुली' या स्टार प्रवाहवरील मालिकेने सध्या प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. जानकी आणि हृषीकेश यांच्या लग्नापूर्वीचा थरार, मकरंदचं जानकीसाठीचं वेड आणि या सगळ्यात त्याला साथ देणारी त्याची बहीण माया, हे सगळं नाट्य सध्या रंगात आलंय. पण पडद्यावर खलनायिका माया म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने या एका सीनसाठी चक्क चिखलात लोळण घेतली आहे. इतकंच नाही, तर हे शूटिंग करताना तिचे गुडघेही फुटले आहेत.

चिखलात लोळली 'माया', अश्विनीने शेअर केले BTS Photos

मालिकेतील एका सीनमध्ये, मकरंद जेव्हा जानकीला मागणी घालायला जातो, तेव्हा मायाही त्याच्यासोबत दिमतीला असते. चाळीत उभ्या असताना लहान मुलांशी तिचा पंगा होतो आणि मुलांचा पाठलाग करताना माया थेट चिखलात तोंडावर पडते. २९ डिसेंबरच्या भागात प्रेक्षकांनी हा सीन पाहिला, पण तो शूट करताना अश्विनीची जी तारांबळ उडाली, त्याचे BTS फोटो तिने आता शेअर केले आहेत.
advertisement
पूर्णपणे चिखलाने माखलेली अश्विनी या फोटोंमध्ये दिसतेय. ती सांगते, "शूटिंग करताना मी खरंच पडले आणि कितीतरी वर्षांनी माझे गुडघे फुटले. हे पाहून मला माझं लहानपण आठवलं. तेव्हाही खेळताना, भांडताना असेच गुडघे फुटायचे." अश्विनीने ही धडपड होऊनही मोठ्या खिलाडूवृत्तीने शूटिंग पूर्ण केलं, त्याबद्दल तिचं कौतुक होत आहे.
advertisement

फोटोंसाठी अश्विनीचं हटके कॅप्शन

अश्विनीने आपल्या पोस्टला एक जबरदस्त फिल्मी टच दिला आहे. मकरंदची भूमिका साकारणाऱ्या कश्यप परुळेकरसोबतचा फोटो शेअर करत तिने लिहिलंय, "जानकी तुझीच होणार रे मकरंद दादा... और मेरा वचन ही है मेरा शासन! #विषय_end. राहुल लिंगायत सर आणि माझं ठरलंय, विजयाचा गुलाल आपलाच!" मायाची ही जिद्द पाहून प्रेक्षकही चक्रावून गेले आहेत.
advertisement
advertisement

जानकीची कमेंट अन् सोशल मीडियावर कल्ला

अश्विनीच्या या आव्हानात्मक पोस्टवर प्रत्यक्ष 'जानकी' म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने कमेंट केली आहे. रेश्माने लगेच सडेतोड उत्तर देत लिहिलं, "तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही!" रेश्माच्या या एका कमेंटने नेटकरीही पोट धरून हसले. जानकी मकरंदची होणार की हृषीकेशची? हे तर मालिकेत कळेलच, पण या दोघींच्या मैत्रीपूर्ण वॉरने चाहत्यांची चांगलीच करमणूक केली आहे.
advertisement

मालिकेत काय घडतंय?

सध्या मालिकेत मकरंदचा 'मास्क मॅन' बनून जानकीला त्रास देण्याचा भूतकाळ उलगडत आहे. माया ही केवळ बहीण नसून मकरंदच्या प्रत्येक वाईट कामातली भागीदार आहे, हे ही समोर आलंय. या लग्नापूर्वीच्या विशेष भागांमुळे मालिकेची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
चिखलात माखली, गुडघे फोडून घेतले; शूटिंगदरम्यान भान विसरली अभिनेत्री, ओळखणंही कठीण, पाहा BTS PHOTOS
Next Article
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement