TRENDING:

Akola News: मशिदीबाहेरच सपासप वार, काँग्रेसच्या बड्या नेत्याला संपवलं, हादरवणारं कारणं आलं समोर, अकोल्यात खळबळ

Last Updated:

Congress Leader Murder : काँग्रेसचे जेष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर काल दुपारी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. आज पहाटे त्यांचे निधन झाले. या हल्ल्यामागील कारण समोर आले आहे.

advertisement
कुंदन जाधव, प्रतिनिधी, अकोला: काँग्रेसचे जेष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल अध्यक्ष यांच्यावर काल दुपारी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर अकोट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे.. त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.. दरम्यान या प्रकरणात रात्री उशिरा एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मशिदीबाहेरच सपासप वार, काँग्रेसच्या बड्या नेत्याला संपवलं, हादरवणारं कारणं आलं समोर, अकोल्यात खळबळ
मशिदीबाहेरच सपासप वार, काँग्रेसच्या बड्या नेत्याला संपवलं, हादरवणारं कारणं आलं समोर, अकोल्यात खळबळ
advertisement

उबेद खान कालू खान उर्फ रजीक खान या आरोपीला अकोल्यातील पणज येथून रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.. यामधील आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा हल्ला राजकीय की, जुन्या वैमनस्यातून करण्यात आला, पोलिस सखोल तपास करत आहेत.

अकोट तालुक्यातील मोहाळा येथील मशिदीत हिदायत पटेल दुपारी १:३०च्या सुमारास नमाज पठणाकरिता गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत ते मशिदीतून बाहेर निघाले असता त्यांना तातडीने अकोट येथे उपचाराकरिता हलविण्यात आले. हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मोहाळा गावात व अकोट शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक हे परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या घटनेनंतर संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे..

advertisement

हल्ल्याला पूर्ववैमनस्याची किनार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर २४ मे २०१९ रोजी मोहाळा येथे भाजपा अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीन खाँ शेर खाँ पटेल यांची हत्या झाली होती. या प्रकरणी मुमताज खाँ यांच्या फिर्यादीवरून हिदायतउल्ला खाँ बरकतउल्ला खाँ पटेल यांच्यासह १० जणांविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ सह इतर चार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पटेल यांच्यावर हल्ला झाला. मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल याने आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हिदायत पटेल यांच्यावर हा हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Akola News: मशिदीबाहेरच सपासप वार, काँग्रेसच्या बड्या नेत्याला संपवलं, हादरवणारं कारणं आलं समोर, अकोल्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल