TRENDING:

अभ्यासू, संघाशी संबध; भाजपने समीर राजूरकर यांची निवड छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदासाठी का केली?

Last Updated:

  समर्थनगर प्रभागाचे अभ्यासू नगरसेवक समीर राजूरकर यांची शहराच्या महापौरपदी भाजपने निवड केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhajinagar Mayor)

महापौरपदी कोण विराजमान होणार? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. शहराचे महापौरपद 'खुले' (सर्वसाधारण) जाहीर झाल्याने अनेक नावे पुढे आली होती. मात्र आज अखेर भाजपने आपला पत्ता उघड केला आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आणि  समर्थनगर प्रभागाचे अभ्यासू नगरसेवक समीर राजूरकर यांची शहराच्या महापौरपदी भाजपने निवड केली आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे ठरले आहे. संभाजीनगरमध्ये महापौर भाजपाचा तर उपमहापौर शिवसेनेचा आहे. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेना सत्तेत सोबत बसणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या 115 असून महापौर पदासाठीची मॅजिक फिगर 58 आहे. बहुतमताचा आकडा गाठण्यासाठी 58 नगरसेवकांची गरज असताना येथे भाजप-शिवसेना स्वबळावर लढल्याने सत्तास्थापनेसाठी युती होणार की नाही याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. येथील महापालिका निवडणुकीत भाजपचे 57 नगरसेवक निवडून आले आहेत.

advertisement

कोण आहेत भाजपचे महापौर समीर सुभाष राजुरकर?

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक
  • सामाजिक कार्यात रा.स्व. संघाच्या माध्यमातून योगदान.
  • स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वातील संघर्ष यात्रेत सहभाग
  • १९९५ - भाजयुमो समर्थनगर वॉर्ड अध्यक्ष
  • १९९७ - भाजयुमो शहर विद्यार्थी आघाडी
  • २००० - भाजयुमो अध्यक्ष, शहर विद्यार्थी आघाडी
  • २००२ - भाजयुमो सरचिटणीस, जिल्हा विद्यार्थी आघाडी
  • advertisement

  • २००५ ते २००९ - भाजयुमो जिल्हाध्यक्ष
  • २०१० -भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत तत्कालीन शिवसेनेचे बंडखोर आमदार जैस्वाल यांच्या नेतृत्वातील शहर प्रगती आघाडीकडून समर्थनगर वॉर्ड येथून नगरसेवक.
  • पुन्हा भाजप मध्ये प्रवेश
  • २०१९ ते २०२३ - भाजपा शहर जिल्हा सरचिटणीस
  • २०२४ - लोकसभा निवडणूक संयोजक, भाजप
  • २०२४ - गंगापूर विधानसभा निवडणूक प्रमुख, भाजप
  • advertisement

  • २०२५ - छत्रपती संभाजीनगर निवडणूक प्रमुख, भाजप
  • २०२६ - भाजपकडून पहिल्यांदा आणि मनपात दुसऱ्यावेळी नगरसेवक म्हणून निवड
  • आता भारतीय जनता पक्षाकडून महापौर

एमआयएमला रोखण्यासाठी आक्रमक आणि तरुण चेहरे

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 33 नगरसेवकांसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एमआयएम पक्षाला रोखण्यासाठी भाजप-शिवसेनेने समीर राजूरकर, राजेंद्र जंजाळ यांच्या रूपाने आक्रमक आणि तरुण चेहरे दिले आहेत. समीर राजूरकर हे भाजपचे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. समर्थ नगर प्रभागातून ते निवडून आले आहेत.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायदेशीर, पौष्टिक सुरणाचे काप, रेसिपीचा Video
सर्व पहा

२ तासांवर मुलीचं लग्न पण पक्षाची शिस्त महत्त्वाची, भाजप नगरसेविका आधी महापालिकेत, मतदान करून लग्नमंडपात

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अभ्यासू, संघाशी संबध; भाजपने समीर राजूरकर यांची निवड छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदासाठी का केली?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल