advertisement

२ तासांवर मुलीचं लग्न पण पक्षाची शिस्त महत्त्वाची, भाजप नगरसेविका आधी महापालिकेत, मतदान करून लग्नमंडपात

Last Updated:

Nashik Election 2026 : महापालिका महापौरपदाची निवडणूक आज पार पडली आहे. महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके तर उपमहापौर पदी विलास शिंदे विराजमान झाले आहे.

Nashik Election
Nashik Election
नाशिक : महापालिका महापौरपदाची निवडणूक आज पार पडली आहे. महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके तर उपमहापौर पदी विलास शिंदे विराजमान झाले आहे. या वेळी मतदान प्रक्रियेसाठी भाजपसह शिंदे सेनेचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी भाजपच्या नगरसेविका इंदूती खेताडे या चर्चेच्या केंद्रस्थानी होत्या.
मुलीचं लग्न सोडून मतदानाला
भाजपच्या नगरसेविका इंदूती खेताडे यांच्या मुलीचे आज दुपारी १२:३० वाजता लग्न होतं. मात्र आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी थोड्या काळासाठी लग्न सोडून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याला पसंती दिली. त्या आल्या मतदान केलं आणि पुन्हा मुलीच्या लग्नासाठी गेल्या. त्याच्या या कामगिरीचे पक्षासह नागरिकांकडून कौतुक होत आहे.
महापालिकेत महायुतीचे सत्तास्थापन
नव्या सत्तारचनेनुसार भाजप, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे पक्ष सत्तेत सहभागी होणार आहेत. या घडामोडींमुळे नाशिक महापालिकेतील सत्तेचे गणित स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्व काळात एकमेकांवर जोरदार टीका करणारे हे पक्ष आता एकत्र सत्तेत सहभागी झाले आहेत, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
भाजपकडे महापौरपद तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडे उपमहापौरपद देण्यात आले आहे. त्यानुसार हिमगौरी आडके महापौरपदी तर विलास शिंदे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत.
महापालिका निवडणुकीचा निकाल काय होता?
अलीकडील महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ७२ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले. शिंदे गटाच्या शिवसेनेने २६ जागा मिळवल्या, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला १५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या असून, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा जिंकल्या आहेत. मनसेला १ जागा मिळाली असून, एका जागेवर अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
२ तासांवर मुलीचं लग्न पण पक्षाची शिस्त महत्त्वाची, भाजप नगरसेविका आधी महापालिकेत, मतदान करून लग्नमंडपात
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement