याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर रेल्वे टर्मिनलचं काम सुरू आहे. 'अमृत भारत स्टेशन योजने' अंतर्गत हे टर्मिनल उभारलं जात असून त्यासाठी सुमारे 135 कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे. या टर्मिनलच्या निर्मितीमुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील गाड्यांचा आणि प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होईल. या टर्मिनलचे काम डिसेंबर 2025 अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला याठिकाणाहून हरंगुळ एक्सप्रेससह 8 नवीन गाड्या सुरू करण्याचं नियोजन आहे.
advertisement
अत्याधुनिक सुविधा
हडपसर टर्मिनलवरील अप आणि डाउन प्लॅटफॉर्मची लांबी 600 मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता याठिकाणी 24 डब्यांच्या गाड्यांनाही थांबा घेता येईल. या प्रकल्पात जुन्या मालवाहतूक मार्गांचं रूपांतर, एक नवीन मालवाहतूक कॉरिडॉर, आधुनिक सोयीसुविधा असलेली स्टेशन इमारत, सर्क्युलेटिंग क्षेत्र, पार्किंगची सुविधा आणि इतर यंत्रणा उभारण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसर टर्मिनलवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 चं काम पूर्ण झालं आहे. लवकरच एक लिफ्ट, एस्कलेटर, 12 मीटर रुंदीचा फूटओव्हर ब्रिज, रूफ प्लाझा आणि निवासगृह अशा सुविधाही उपलब्ध होणार आहेत. हे टर्मिनल पूर्ण झाल्यानंतर हडपसर स्टेशनमधून प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल. परिमाणी पुणे शहरातील रेल्वे वाहतुकीचा विस्तार होईल.
