Kolhapur Mumbai Flight: कोल्हापूरकरांसाठी गूड न्यूज, मुंबईसाठी दिवसातून दोनदा मिळणार फ्लाईट, कसं असेल वेळापत्रक ?

Last Updated:

Kolhapur Mumbai Flight: कोल्हापूर-मुंबई हवाईमार्ग हा 'उडान' योजनेत मोडतो. त्यामुळे सध्या सेवा देणारी विमान कंपनी दुसऱ्या विमान कंपन्यांना 'एनओसी' देत नव्हती. मात्र, सप्टेंबर महिन्यात या योजनेची मुदत संपणार आहे.

Kolhapur Mumbai Flight: कोल्हापूरकरांसाठी गूड न्यूज, मुंबईसाठी दिवसातून दोनदा मिळणार फ्लाईट, कसं असेल वेळापत्रक?
Kolhapur Mumbai Flight: कोल्हापूरकरांसाठी गूड न्यूज, मुंबईसाठी दिवसातून दोनदा मिळणार फ्लाईट, कसं असेल वेळापत्रक?
कोल्हापूर: धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोल्हापूर शहराचा वेगाने विकास होत आहे. या शहराची आणि इतर ठिकाणांशी असलेली कनेक्टिव्हिटी देखील मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. कोल्हापूरमध्ये विमानतळाची निर्मिती झालेली असून त्या ठिकाणाहून विमानसेवा देखील सुरू झालेली आहे. कोल्हापूरमधील विमानसेवेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. करवीरनगरीमधून मुंबईला जाण्यासाठी आणखी एक फ्लाईट सुरू होणार आहे. कोल्हापूर-मुंबई दरम्यान दिवसातून एकच फ्लाईट जात होती. त्यामुळे घाईच्या कामासाठी प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या.
समोर आलेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांच्या सोयीसाठी कोल्हापूर-मुंबईदरम्यान दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सकाळी लवकर मुंबईला जाऊन काम आटोपून रात्री परत येणे शक्य होणार आहे. येत्या 11 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे.
advertisement
कोल्हापूर-मुंबई हवाईमार्ग हा 'उडान' योजनेत मोडतो. त्यामुळे सध्या सेवा देणारी विमान कंपनी दुसऱ्या विमान कंपन्यांना 'एनओसी' देत नव्हती. मात्र, सप्टेंबर महिन्यात या योजनेची मुदत संपणार आहे. त्यामुळे इतर विमान कंपन्यांसाठी हा मार्ग खुला झाला आहे. इंडिगोने कोल्हापूर-मुंबईसाठी मागणी केलेल्या मार्गाला मंजुरी मिळाली असून 11 नोव्हेंबरपासून सकाळी आणि रात्री अशा दोन फ्लाईट सुरू होणार आहेत.
advertisement
कोल्हापूर-मुंबई फ्लाईटचं संभाव्य वेळापत्रक
मुंबई-कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोल्हापूरला येणारी फ्लाईट पहाटे 6 वाजून 5 मिनिटांनी टेकऑफ करेल आणि सकाळी 7 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
कोल्हापूर-मुंबई: छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून मुंबईला येणारी फ्लाईट सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी टेकऑफ करेल आणि सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.
मुंबई-कोल्हापूर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही फ्लाईट रात्री 7 वाजून 10 मिनिटांनी निघेल आणि रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल.
advertisement
कोल्हापूर-मुंबई: छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून ही फ्लाईट रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी निघेल आणि रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी मुंबईला पोहोचेल.
सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा लवकरच
सोलापूर शहर आता थेट देशाच्या प्रमुख आर्थिक केंद्रांशी थेट जोडलं जाणार आहे. सोलापूर-पुणे-मुंबई विमान सेवेसाठी केंद्र सरकारने 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. ही विमानसेवा उडान योजनेअंतर्गत सुरू होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या वर्षी तिकिटांवर 100 टक्के आर्थिक मदत दिली जाईल. सुमारे 3,240 रुपयांपर्यंत तिकिट उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur Mumbai Flight: कोल्हापूरकरांसाठी गूड न्यूज, मुंबईसाठी दिवसातून दोनदा मिळणार फ्लाईट, कसं असेल वेळापत्रक ?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement