कंत्राटी भरती महाविकासआघाडीचं पाप असल्याचा आरोप करत भाजपने राज्यभरात महाविकासआघाडी माफी मांगो आंदोलन केलं. ठाणे, पुणे, कोल्हापूरसह भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका
कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. कंत्राटी भरतीच्या जीआरवर ज्या नेत्यांनी सही केली आहे, ते नेते आज सत्तेत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्या नेत्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे, तसंच आमच्या दबावामुळे कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
advertisement
'राज्यात आंदोलनं चालली आहेत, या आंदोलनांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. हिंसा होईल की काय, अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्येही वाद दिसतोय, त्यामुळे गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
'जीआरच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये कोण कोण होतं? एकनाथ शिंदे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, उदय सामंत, धनंजय मुंडे, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे सगळे त्या कॅबिनेटला हजर होते, त्यामुळे माझी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना विनंती आहे की ज्यांच्या सह्या आहेत त्यांचे राजीनामे घ्या,' अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
