TRENDING:

Dahisar Toll Plaza: वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार! 'या' टोलनाक्याची आता जागाच बदलणार

Last Updated:

Dahisar Toll Plaza: या टोल नाक्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महानगरी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या झाली आहे. ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दररोजच्या वाहतूककोंडीचे केंद्र ठरणाऱ्या दहिसर टोल नाक्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर टोल नाक्याचं स्थलांतर करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केला आहे. या प्रस्तावात वसईच्या बाजूने वर्सोवा उड्डाणपुलापूर्वी टोल नाक्याचं स्थलांतर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे दहीसर टोलनाका हा वसई-विरार महापालिकेच्याहद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर स्थलांतरित होण्याची दाट शक्यता आहे.
Dahisar Toll Plaza: वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार! या टोलनाक्याची आता जागाच बदलणार
Dahisar Toll Plaza: वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार! या टोलनाक्याची आता जागाच बदलणार
advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर टोल नाक्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. मिरारोडच्या दिशेने जाणारा आणि मुंबईच्या दिशेने येणारा अशा दोन्ही मार्गांवर नेहमी वाहनांच्या रांगा असतात. त्यामुळे मिरा-भाईंदरसह वसई, विरार, पालघर, गुजरात आणि अन्य राज्यांतून येणाऱ्यांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे हा टोल नाका स्थलांतरित करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनीही हा टोलनाका स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.

advertisement

Elphinstone Bridge: एल्फिन्स्टन पूल प्रकल्पग्रस्तांपुढे सरकारने टेकले हात! देणार म्हाडाची घरं, लोकेशन काय?

प्रताप सरनाईक यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले होते. 11 सप्टेंबर रोजी सरनाईक, एमएसआरडीसी, एनएचएआय आणि स्थानिक पोलिसांनी हा टोलनाका कुठे स्थलांतरित करता येईल, याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर एमएसआरडीसीने अहवाल सादर केला.

advertisement

या अहवालाच्या आधारे एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदाल यांनी एनएचआयच्या अध्यक्षांकडे त्यांच्या ताब्यात असणाऱ्या वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाआधी टोलनाका स्थलांतरित करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे जवळच्या शहरी भागातील वाहतुकीचा ताण नाक्यावर येणार नाही, असं या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे. या मार्गावर फास्ट टॅगसह इतर तंत्रज्ञानाचा वापर करून टोलनाक्यावर होणारी कोंडी टाळता येईल, असंही एमएसआरडीसीने प्रस्तावात स्पष्ट केलं आहे.

advertisement

याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली आहे. टोलनाका स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीचे निर्देश 'एनएचएआय'ला द्यावेत, अशी विनंती सरनाईक यांनी केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dahisar Toll Plaza: वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार! 'या' टोलनाक्याची आता जागाच बदलणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल