TRENDING:

दादांच्या अपघातावर अनेकांना संशय, सुनेत्रा पवार थेट फडणवीसांकडे, पत्र देत मोठी मागणी

Last Updated:

आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी भेट घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात यावरून अनेक शंका, संशय आणि प्रश्नांचे वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी, मंत्री महोदय तसेच खासदारांनी देखील अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सुनेत्रा पवार-देवेंद्र फडणवीस
सुनेत्रा पवार-देवेंद्र फडणवीस
advertisement

याच पार्श्वभूमीवर दादांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, युवा नेते पार्थ पवार यांनी भेट घेतली.

advertisement

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्य सरकारकडून पत्रव्यवहार केला जाईल आणि ही सर्व चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस सीबीआयमार्फत करु इच्छित आहे. त्यासंदर्भात पाऊले उचलली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली.

निवेदनात काय म्हटलंय?

गंभीर अनियमितता आणि संशयास्पद परिस्थिती -नोंदवलेले आणि गोळा केलेले विविध तथ्ये, महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात, ज्यात हे समाविष्ट आहे परंतु इतकेच मर्यादित नाही:

advertisement

अ) उड्डाण क्रू रचनेत शेवटच्या क्षणी झालेले बदल, ज्यासाठी ऑपरेशनल निर्णय घेण्याची आणि अधिकृततेची तपासणी आवश्यक आहे,

ब) हवाई वाहतूक नियंत्रण संप्रेषण आणि धावपट्टीच्या मंजुरीच्या क्रमवारीशी संबंधित स्पष्ट विसंगती

क) गंभीर ऑनबोर्ड सुरक्षा चेतावणी प्रणालींच्या कार्यप्रणाली आणि अखंडतेबद्दल चिंता

ड) लँडिंग टप्प्याच्या जवळ असूनही कोणत्याही रेकॉर्ड केलेल्या संकट संप्रेषणांची अनुपस्थिती

advertisement

ई) क्रू फिटनेस, देखभाल, अनुपालन आणि विमान प्रणालींसह फॉरेन्सिक मूल्यांकन आवश्यक असलेल्या बाबी. आदी.

ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्याचवेळी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यापूर्वी अशा घटनांसाठी स्वायत्त यंत्रणा नेमलेल्या आहेत. त्या यंत्रणांनी तपास सुरू केल्याचे घोषित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्वायत्त यंत्रणा तपास करत आहेत पण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास होऊ शकतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीच्या दरात झाली मोठी वाढ, सोयाबीनला काय मिळाला दर?
सर्व पहा

ज्यावेळी स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळी बाह्य देशातील यंत्रणाही अपघाती प्रकरणाचा तपास करत असतात असे सांगतानाच या प्रकरणाचा सखोलतेने तपास व्हावा. जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत त्या सर्व मुद्द्यांचा तपास व्हावा आणि निष्कर्ष लवकरात लवकर राज्यातील नव्हे तर देशातील जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांच्या अपघातावर अनेकांना संशय, सुनेत्रा पवार थेट फडणवीसांकडे, पत्र देत मोठी मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल