मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'न्यूज १८ मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्यावर भाष्य केले. कोस्टल रोड, मेट्रो, लोकल ट्रेन अशा विविध प्रकल्पातून भाजपनं मुंबईच्या दळणवळण क्षेत्रात घडवले क्रांतिकारी बदल आदी मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'न्यूज १८ मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले.
अजित पवारांनी युती धर्म तोडला...
पिंपरी-चिंचवड आणि इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच युतीधर्म मोडला. निवडणूक प्रचारात एकमेकांबाबत टीका करण्याबाबत काही गोष्टी ठरवल्या होत्या. एकमेकांविरोधात बोलणार नाही असे ठरवले. पुण्यात अजित पवार यांनी संयम ठेवला नाही. त्यांनी योग्य पद्धतीने भूमिका मांडली नाही. ज्या प्रकारे वक्तव्य केली, ती शोभणारी नव्हती. मी त्यावर बोलणार नाही. उत्तर देणार नाही. मी खूप संयमी आहे. मी मित्रपक्षांवर बोलणार नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
advertisement
ठाकरे बंधूंना थेट सवाल...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य करताना हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, ही मराठी माणसाच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे. सत्ता हाती असताना ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं, असा रोखठोक सवाल त्यांनी केला. आम्ही मराठी माणसासाठी केलेली अनेक कामे सांगतो, पण त्यांनी मराठी माणसासाठीचे एक काम सांगावे असेही त्यांनी म्हटले.
