गेल्या सव्वा वर्षातील राजकीय घडामोडींवर भाष्य धनंजय मुंडेंनी केले आहे. माझ्यावर अनेक आघात झाले, अनेकांनी टीका केली. पण मी सव्वा वर्ष शांत राहिलो. जर माझ्या गप्प राहण्यामध्ये एवढी मोठी ताकद असेल, तर मी बोलायला लागल्यावर काय होईल, याचा विचार करा... विरोधकांच्या टीकेला त्यांनी टोला लगावला. यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या समर्थकांच्या डोळ्यांत मुंडेंवर झालेल्या अन्यायाचा राग आणि ते पुन्हा जोमाने सक्रिय झाल्याचा आनंद, अशा दोन्ही भावना दिसत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
advertisement
रथात का बसलो नाही? धनंजय मुंडेंनी उलगडलं गुपित
कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी मुंडे यांना रथावर बसवण्याचा मोठा आग्रह धरला होता, मात्र त्यांनी तो नाकारला. त्यामागचे गुपित सांगताना ते म्हणाले, "रथावर बसायचे असेल तर घोड्याच्या रथावर बसावे लागते, मोराच्या नाही. माझे नाव 'धनंजय' आहे, जे अर्जुनाच्या नावांपैकी एक आहे. त्यामुळे कुठल्या रथावर आणि कधी बसायचे, हे मला चांगले ठाऊक आहे. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
बीडच्या राजकारणात नवी चर्चा
बीडमधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचा पट उलगडत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. त्यांच्या राजकीय फटकेबाजीने बीडच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.
