TRENDING:

Dharashiv Crime : उद्धव ठाकरेंच्या महिला नेत्याची फसवणूक, तब्बल 7 लाखाला लुबाडले,नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (Shiv Sena UBT) गटाच्या महिला नेत्या मनीषा वाघमारे यांची मोठी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
manisha waghamare yuvasena (Photo -instargram)
manisha waghamare yuvasena (Photo -instargram)
advertisement

Dharashiv Crime News : बालाजी निरफळ, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (Shiv Sena UBT) गटाच्या महिला नेत्या मनीषा वाघमारे यांची मोठी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. शासकीय टेंडर मिळवून देतो असे आमिष दाखवून ही फसवणूक झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मनीषा वाघमारे यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रावरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करतायत.

advertisement

धाराशिवच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (Shiv Sena UBT) गटाच्या युवासेनेच्या महिला नेत्या मनीषा वाघमारे यांची 7 लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. धाराशिवमध्ये शासकीय टेंडर मिळवून देतो,असे सांगून मनीषा वाघमारे यांची फसवणूक करण्यात आली होती. तसेच आरोपीने दोन महिन्यांत 7 लाखांच्या बदल्यात 10 लाख देतो असे आमिषही दाखवले होते.या आमिषाला बळी पडत मनीषा वाघमारे यांनी 7 लाख देऊ केले होते.

advertisement

दरम्यान ठरलेल्या वेळेत रक्कम देऊ न केल्याने आणि पैशांची विचारणा केल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणतो आणि जीवे मारतो अशी धमकी आरोपीने मनीषा वाघमारे यांनी दिली होती. या धमकीनंतर मनीषा वाघमारे यांनी 4 ऑगस्ट रोजी आनंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन महिन्यांत 7 लाखांच्या बदल्यात 10 लाख देतो असे आमिष दाखवले होते. परंतु मुदत उलटल्यानंतर पैसे परत केले नव्हते. तसेच पैसे न देता महिलेला धमकी दिली होती. यानंतर मनीषा वाघमारे यांनी तक्रार प्राप्त होता पोलिसांनी साताऱ्यातील प्रयास उर्फ शंभुराजे दत्तात्रय भोसले (रा. होळ, ता. खटाव) याच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात फसवणूक व धमकीचे गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv Crime : उद्धव ठाकरेंच्या महिला नेत्याची फसवणूक, तब्बल 7 लाखाला लुबाडले,नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल