Dharashiv News : धाराशीवमध्ये आज तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे अध्यक्ष आनंद पाटील यांच्याच भयंकर बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. या राड्यानंतर प्रताप सरनाईक यांनी बैठक आटोपती घेतली होती.
advertisement
धाराशीवमध्ये आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवसेना युबीटीचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. शेतकरी तक्रारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यामुळे इतर कोणत्याही मुद्यावर चर्चा होणार नव्हती. तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे अध्यक्ष आनंद पाटील सतत आपला मुद्दा मांडत होते. त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना हटकले.
ओमराजे निंबाळकर यांनी हटकल्यानंतर आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू द्या मग राजकीय नेत्यांनी बोला असे म्हणत त्यांनी आनंद पाटील यांना बोलण्यास मज्जाव केला होता. तरी देखील आनंद पाटील यांनी मी जिथल्या तक्रारी करतो त्या जागच्या गावात तुमचे मामा ठेकेदार आहेत असे वाक्य उच्चारताच ओमराजे निंबाळकर भयंकर संतापले.
त्यामुळे पवनचक्कीच्या कामासंदर्भातील तक्रारीवरून खासदार ओमराजे निंबाळकर व आनंद पाटील यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीमुळे बैठकीत तुफान राडा झाला होता. त्यामुळे वैतागुन प्रताप सरनाईक यांनी बैठक आटोपती घेतली होती.
