आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कट्टर समर्थकांसहित शिवसेनेतील अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास आठ ते दहा महत्त्वाचे पक्षप्रवेश ठाकरे गटातून भाजपमध्ये झाले आहेत. निवडणुकीतील यशानंतरही भाजपकडून ऑपरेशन कमळ सुरूच असून ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकारी भाजपच्या गळाला लागत आहेत.
धाराशिवची राजकीय समीकरणे बदलणार
श्याम जाधव यांचे धाराशिवमध्ये चांगलेच राजकीय वजन आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
advertisement
श्याम जाधव यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी खूप महत्त्वाचा
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
