सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून निवडणुकीतून माघार घेतल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष म्हणून तेर आणि केशेगाव गटातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र त्यांच्या उमेदवारीने पक्षात असंतोष उफाळून आला होता. त्यामुळे पक्षाकडून त्यांना माघारीचे आदेश देण्याचे आल्याचे कळते.
भारतीय जनता पक्षाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल-विश्वास मल्हार
advertisement
अर्चना पाटील यांनी जरी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी भारतीय जनता पक्षाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, असा विश्वास मल्हार पाटील यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष संघटन स्तरावर धाराशिवमध्ये मोठे काम करीत असल्याचे दिसते. जिल्ह्यात भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून अध्यक्षही भाजपचा होईल, असे मल्हार पाटील म्हणाले.
अर्चना पाटील यांनी कोणत्या कारणामुळे माघार घेतली?
अर्चना पाटील यांनी आता माघार घेतल्याने राजकीय चर्चेला जोरदार उधाण आले आहे. अर्चना पाटील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत ठाम राहतात का? किंबहुना त्यांनी माघार घेण्याचे नेमके कारण काय? पक्षाने त्यांना माघारीचा आदेश का दिला? असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.
