श्रेया सुरेश पात्रे असं या अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. श्रेया ही इयत्ता सहावीत शिकणारी शाळकरी मुलगी होती. तर, या घटनेत श्रद्धा श्रीकांत कांबळे ही सातवीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती देखील गंभीर आहे.
advertisement
मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी, 10 किमी वाहनांच्या रांगा, प्रवाशांचे हाल
येणेगूर येथे महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अपघात झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसंच संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग दोन तासांपासून रोखून धरला आहे. महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी गावकऱ्यांची केली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असले तरी गावकरी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून दोन तासापासून गोंधळ सुरू आहे.
मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी -
दुसऱीकडे, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई लेनवर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे, त्यातच खानिवडे जवळ कंटेनर उलटण्यामुळे तिथेही वाहतूक कोंडी झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवासी कंटाळले आहेत. वसई हद्दीत मोठ्या गाड्यांमुळे जास्त ट्रॅफिक जाम झालं आहे. मुंबई आणि गुजरात दोन्ही लेन मागच्या 4 तासापासून ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.