स्वतःचा वेल्डिंगचा व्यवसाय सुरू -
पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अभिजीत देशमुख यांनी वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. यानंतर आता वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. पदवी पर्यंतचे शिक्षण संपल्यानंतर घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी सुरुवातीला दुसऱ्याच्या वेल्डिंगच्या दुकानात कामाला सुरुवात केली. त्याठिकाणी त्यांनी 3 ते 4 वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी आपला वेल्डिंगचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मेहनतीने आणि कष्टाने आता त्यांच्या या व्यवसायाची मोठी भरभराट झाली आहे.
advertisement
महाराष्ट्रातील बहुरुपी लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर, धाराशिवमधील परिस्थिती काय, VIDEO
वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल -
अभिजीत देशमुख यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र, त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यानंतर त्यांच्या जगण्याचा संघर्ष सुरू झाला. याच परिस्थितीत त्यांनी गावातील वेल्डिंगच्या दुकानात सुरुवातीला तीन ते चार वर्षे काम केले. याठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. आपल्या या व्यवसायातून ते आता वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
अभिजीत यांनी आता आपला स्वतःचा व्यवसाय थाटला आहेत. त्यात कुक्कुटपालन शेड, कांदा चाळ, गाय गोठा, गणपतीचे मखर, गौराईचे मखर, शेती अवजारे आदी गोष्टी याठिकाणी बनवल्या जातात. तसेच ऑन कॉल जिथे गरज असेल तिथे जाऊनही ते काम करतात. एकेकाळी नोकरी मिळत नसताना कुठेतरी मजुरी करावी लागली. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तिथे मेहनतीने आणि कष्टाने सातत्याने काम केल्याने आज त्यांचा व्यवसाय यशस्वी झाला आहे. त्यांची ही कहाणी सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.