नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
'ठाकरे सरकारच्या काळात मराठ्यांचं आरक्षण गेलं, ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करू शकलं नाही. त्यांंना साधा वकीलही लावता आला नाही. मराठा आरक्षणाचे मारेकरी असलेल्या तत्कालीन ठाकरे सरकारला काळे झेंड दाखवा. मी मराठा आरक्षणाच्या बाजुने आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याची' प्रतिक्रिया यावर बावनकुळे यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर सरकारने शिंदे समितीची नियुक्ती केली. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळी त्यांनी सरकारला आरक्षणासाठी आता 24 डिसेंबरपर्यंतची नवी डेडलाईन दिली आहे.