जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या सुनील प्लाझा येथील ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसाढवळ्या लुटण्यात आली. घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधून सदर घडलेली घटना सांगितली त्यानंतर पोलीस तिथे आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर दाखल झाले असुन तपास सुरू आहे.
advertisement
अज्ञात पाच जणांनी ज्योती क्रांती या बँकेत प्रवेश केला. यावेळी बँकेत दोन कर्मचारी उपस्थित होते. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात पाच जणांनी बँकेमध्ये प्रवेश केला होता. अद्यापपर्यंत किती मुद्देमाल गेला आहे, याची माहिती मात्र कळू शकली नाही. मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावत बँक लुटल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.