अर्चना पाटील यांच्या बाजूने शिवसेना नेते तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, अर्चना पाटील यांचे पती भाजप आमदार राणा पाटील, आमदार अभिमन्यू पवार, बार्शीचे भाजप आमदार राजा राऊत, माजी आमदार बसवराज पाटील या मातब्बर नेत्यांनी मोठं बळ उभा केलं होतं. त्यातल्या त्यात तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात रंगलेल्या शाब्दिक युद्धाने ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. ओमराजे निंबाळकरांचा असलेला जनसंपर्क, फोनवर लोकांच्या संपर्कात राहणे या गोष्टी चर्चिल्या गेल्या. एकीकडे सगळे मातब्बर नेते असताना लोकांशी कायम संपर्कात राहणे, फोन उचलणे या गोष्टी शेवटपर्यंत ओमराजे निंबाळकरांनी प्रचारात आपल्या पथ्थ्यावर पाडून घेतल्या.
advertisement
किती टक्के मतदान झालं?
धाराशिव लोकसभासाठी एकूण 63.88 टक्के इतंक मतदान झालं. 19 लाख 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लाख 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यात 6 लाख 90 हजार 533 पुरुष मतदार आणि 5 लाख 82 हजार 416 महिला, 20 तृतीयपंथी मतदार यांनी मतदान केले. पुरुष मतदार टक्केवारी 65.53 तर महिला मतदार टक्केवारी 61.91 इतकी राहिली. त्यामुळे आता या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.