धाराशिवच्या जागेसाठी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे आता राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात अशी देखील चर्चा आहे. मात्र या जागेबाबत अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाहीये. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतरच या जागेबाबत निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
विक्रम काळे यांचं नाव आघाडीवर
दरम्यान धाराशिव लोकसभेसाठी सध्या विक्रम काळे यांचं नाव आघाडीवर आहे. ते राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार आहेत. मात्र त्यांचा कार्यकाळ आणखी चार वर्ष बाकी असल्यानं त्यांच्या नावाबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या महायुतीकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी इतर पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.