महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात काही दिवसांपूर्वी बोगस पुजाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेला आळा घालण्यासाठी आता तुळजाभवानी मंदिर संस्थान व जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यात पुजाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे केले आहे. ओळख पत्र असेल तरच मंदिरात प्रवेश देण्यासाठी सुरुवात केली असून भोपे, पाळीकर, उपाध्ये अशी पुजारी मंडळे यांना हा निर्णय लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.
advertisement
देवीच्या गाभाऱ्यात दर्शन देण्यावरून धक्काबुक्कीचे प्रकार देखील घडले होते. त्याला आळा बसावा यासाठी काही नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. मंदिर संस्थानाने कठोर कारवाई करावी अशी मागणी पुजारी करत असून ओळख पत्रामुळे मंदिरातील खरे पुजारी ओळखण्यासाठी मदत होईल असे भाविक सांगत आहेत.
वाचा - ‘इथं’ आहे 250 वर्ष जुनं कार्तिक स्वामींचे मंदिर; मोरपंख वाहण्याची अनोखी परंपरा, पाहा Video
देवीच्या आणि भक्तांच्या मधील दुवा म्हणून पुजारी यांच्याकडे पाहिले जाते. मोठी उपाधी असताना त्या पदाचे महत्व ओळखून पूजऱ्यांनी वर्तन करावे अशी अपेक्षा केली जाते. मात्र, काहीजण बोगस पुजारी म्हणुन मिरवत पुजारी या नावाला कलंक लावण्याचे काम करत असतात. त्यालाच आता या निर्णयामुळे चाप बसेल अशी माफक अपेक्षा.