धाराशिव नामांतराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे, राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण केले या नामंतराला उस्मानाबाद नामांतरण कृती समितीने विरोध दर्शवला होता. समितीच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास मनाई करत हे प्रकरण निकाली काढले होते, मात्र उच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान न झाल्याने आता या कृती समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुढील दोन आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी होणार असून, सर्वोच्च न्यायालय आता यावर काय निर्णय घेणारं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्यात आलं आहे. या नामतंरावर अनेकांनी अक्षेप घेतला आहे. उस्मानाबाद नामांतरण कृती समितीच्या वतीनं या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.