घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध येडशी रामलिंगघाट अभयारण्यातील रामलिंग मंदिर परिसरातील माकडांना अन्नातून विष देऊन मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषबाधा झाल्यानेच माकडांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. याप्रकरणी आता अनोळखी व्यक्तींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त इतर कोणत्या आजाराचा संसर्ग या माकडांना होता का याची देखील तपासणी करण्यात येणार असून, पैठण येथील सहाय्यक वनसंरक्षकांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाची परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न वन्यविभाग करत आहे.
advertisement
मागील आठवड्यात या ठिकाणी तब्बल 9 माकडांचा मृत्यू झाला होता. अचानक येथील माकडे आजारी पडू लागल्याने पशुसंवर्धनच्या सहाय्यक आयुक्तांनी शवविच्छेदन करून मृत पावलेल्या माकडांचा व्हिसेरा तपासणीकरिता वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांकडे पाठवला. या व्हिसेराच्या आधारे अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आता अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, कोणत्या कारणामुळे ही माकडे मारली, कोणी मारली याचा शोध घेण्यात येत आहे.