गेल्या अनेक दिवसांपासून अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशाला महायुतीमधूनच काही जणांचा विरोध होता. त्यामुळे हा पक्षप्रवेश रखडला होता. अखेर आज अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मुहूर्त मिळाला आहे. आज दुपारी अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घड्याळ या चिन्हावर धाराशिवची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
दरम्यान राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास धाराशिवमध्ये दीर आणि भावजईमध्ये हाय होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे, धाराशिवची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेली असून, शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात अर्चना पाटील विरोधात ओमराजे निंबाळकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.