नेमकं काय म्हणाले शरद पवार?
पराभवाची भीती वाटत असल्यामुळे मोदी राज्यामध्ये सभा घेत आहेत. पराभव दिसत असल्यामुळे ते अशाप्रकारची वक्तव्य करतात. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये काय केलं त्यांचा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे. त्यांच्याकडे मांडण्यासाठी काहीच नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. ते तुळजापूरमध्ये बोलत होते.
advertisement
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, धाराशिव व लातूर दोन्ही जिल्हे एकत्र होते. स्थानिक नेत्यांना आम्ही खूप प्राधान्य दिलं त्यातून लातूरचा विकास झाला, परंतू धाराशिव आहे त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे नेतृत्व चुकीच्या हातात दिल्याची खंत वाटते असं म्हणत त्यांनी यावेळी पाटील कुटुंबांवर देखील हल्लाबोल केला. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची चांगली परिस्थिती असून, मोठं यश महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा विश्वासही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.