तीन हजार गाड्यांचा ताफा घेऊन 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. वर्षा बंगल्यावर शिवसैनिकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान धाराशिवमध्ये शिवसैनिकांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध होत असल्यानं अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत धाराशिवमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. धाराशिवची जागा ही शिवसेनेच्या हक्काची जागा असल्यानं ती परत घ्यावी अशी भूमिका त्यानी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी नाराज शिवसैनिकांनी राजीनामे देखील दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करणार आहेत. जागा परत न घेतल्यास पुढील निर्णय घेऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धाराशिवच्या जागेचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.